16 November 2019

लोहारा तालुक्यातील तोरंबा येथील भाऊसाहेब बिराजदार प्राथमिक शाळेत पंडीत जवाहरलाल नेहरु यांची जयंती साजरी



प्रतिनिधी / लोहारा

तालुक्यातील तोरंबा येथील भाऊसाहेब बिराजदार प्राथमिक शाळेत गुरुवारी ( दि. १४) पंडीत जवाहरलाल नेहरु यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन शाळेचे मुख्याध्यापक व्यंकट बिराजदार यांनी केले. बाल दिनानिमित्त पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या विषयी सोमनाथ शिंदे यांनी विद्यार्थ्यांना माहिती सांगितली. तर अंबादास नाईक यांनी लोकराज्य मासिकाचे वाचन केले. या कार्यक्रमात बालदिनानिमित्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच ज्या विद्यार्थ्यांचा वाढदिवस होता त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून शाळेत गॅस कनेक्शन घेऊन शालेय पोषण आहाराची आवश्यकता पूर्ण केली. यामुळे शाळा धुरमुक्त झाली आहे. या गॅस चे पूजन शांता कुंभार यांनी केले. कार्यक्रमासाठी गावातील पालक, सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन एल. एम. बोडरे यांनी तर गुलाब माने यांनी आभार मानले.

12 November 2019

लोहारा येथे राष्ट्रवादी काँग्रेस सभासद नोंदणी संदर्भात बैठक संपन्न







प्रतिनिधी / लोहारा

जिल्ह्यात पक्षाची नव्याने बांधणी करण्यासाठी एक लाख सभासद नोंदणीची मोहिम राबवून पक्षाची पूनर्बांधणी करण्याचा निर्णय उस्मानाबाद जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने घेण्यात आला असून लोहारा तालुक्यातील जास्तीत जास्त सदस्यांनी नोंदणी करावी असे आवाहन जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी केले.
                लोहारा येथे रविवारी ( दि. १०) सभासद नोंदणी मोहिमेसंदर्भात बैठक घेण्यात आली. या बैठकीत उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष बिराजदार बोलत होते. या बैठकीसाठी जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अच्युत साठे, युवक तालुकाध्यक्ष नाना पाटील, युवराज कदम, बाबासाहेब जाधव, गोविंद बिराजदार, नगरसेवक गगन माळवदकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
               यावेळी पुढे बोलताना बिराजदार म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, माजी केंद्रिय कृषीमंत्री शरद पवार यांनी विधानसभा निवडणूकीत ऊन, पावसाची तमा न बाळगता पक्षाचा झंझावात निर्माण करून कार्यकर्त्याचा उत्साह द्विगुणीत केला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नेहमी बळ देण्याचे काम केले आहे. निवडणूकीपूर्वी जिल्ह्यात पक्षांतराचे वारे होते. यामुळे पक्षात संभ्रम आहे. यामुळे जिल्ह्यात नव्याने एक लाख सभासद नोंदणीची मोहिम राबवून पक्षाची पूनर्बांधणी  करण्याचा निर्णय उस्मानाबाद जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने घेण्यात आला आहे. पवार साहेबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून उस्मानाबाद जिल्ह्यात एक लाख सभासद नोंदणीची मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही नोंदणी ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. ऑनलाईन नोंदणीसाठी ०२२४०३७५७७१ या टोल फ्री नंबरवर मिसकॉल करावा. त्यानंतर आलेल्या लिंक वर सदस्य नोंदणीचा फॉर्म भरावा. या मोहिमेत तालुक्यातील जास्तीत जास्त युवक, नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी यावेळी बोलताना केले.
                    यावेळी विजय लोमटे, सरपंच विठ्ठल साठे, हेमंत माळवदकर, गजेंद्र जावळे, विद्यार्थी तालुकाध्यक्ष पृथ्वीराज जगताप, दादा पाटील, नवाज सय्यद, मिलिंद नागवंशी, संजय जाधव, अभिजित लोभे, मंगेश पाटील, शैलेश चंदनशिवे, निहाल मुजावर, महेबूब फकीर, प्रशांत सोमवंशी आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

लोहारा येथील डॉ. रूपाली हेमंत श्रीगिरे यांना उस्मानाबाद भुषण पुरस्कार प्रदान



प्रतिनिधी / लोहारा

महात्मा कबीर समता परिषदे तर्फे उस्मानाबाद येथे रविवारी ( दि. १०) आयोजित कार्यक्रमात लोहारा येथील डॉ. रूपाली हेमंत श्रीगिरे यांना उस्मानाबाद भूषण या पुरस्काराने शाल, श्रीफळ, ताम्रपत्र, सन्मानचिन्ह देवुन गौरविण्यात आले.
               डॉ. रूपाली श्रीगिरे यांनी आत्तापर्यंत अनेक प्रसुती अल्पदरात केल्या आहेत. व्यंध्यत्व निवारणासाठी काम केले आहे. तसेच विविध मोफत आरोग्य शिबिरांचे आयोजन करून सामाजिक बांधिलकी जपली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन महात्मा कबीर समता परिषदेकडून मान्यवरांच्या हस्ते उस्मानाबाद भूषण पुरस्कार देऊन डॉ. श्रीगिरे यांचा गौरव करण्यात आला.
                   या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चित्रपट दिग्दर्शक शांतारामजी, कबीर समता परिषदेचे अध्यक्ष मुकुंदराज पाटील, रामकृष्ण बेले, माधव जाधव ,प्रा. डॉ सय्यद अकबर, माजी नगराध्यक्ष  नानासाहेब पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
               डॉ. रुपाली श्रीगिरे यांना उस्मानाबाद भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल लोहारा येथील माजी उपसरपंच व्यंकट घोडके, माजी जि.प सदस्य बाबुराव पवार, उत्तमराव पाटील, बी.एस.स्वामी, रघुनाथ घोडके, गणेश हिप्परगेकर ,खंडु सरवदे, जयसिंग बंडगर, अनिल येल्लोरे, किशोर जावळे, पिंटू वैरागकर, कल्पना मिसाळ, उज्वला सुरवसे, सुदर्शन जगताप आदींनी अभिनंदन केले.