02 January 2020
लोहारा तालुक्यातील सास्तुर येथील निवासी अपंग शाळेत राज्यस्तरीय कवी संमेलनाचे आयोजन
प्रतिनिधी / लोहारा
काव्यप्रेमी शिक्षक मंच सोलापूर या संस्थेच्या वतीने तालुक्यातील सास्तुर येथे रविवारी (दि. ५) दिव्यांग बालमित्रांसोबत हितगुज करण्यासाठी आगळ्यावेगळ्या राज्यस्तरीय कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. सास्तुर येथील निवासी दिव्यांग शाळेत रविवारी ( दि. ५) सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत कवी संमेलन चालणार आहे. या कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी निर्मला बदामे राहणार आहेत. तसेच जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, जिल्हा समाजकल्याण अधिकारी नागनाथ चौगुले, राजन लाखे, अरविंद हंगरगेकर, सास्तुर चे सरपंच यशवंत कासार, स्पर्श रुग्णालयाचे प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी, काव्यप्रेमी शिक्षक मंचचे राजाध्यक्ष आनंद घोडके, राज्य सचिव कालिदास चवडेकर, राज्य कोषाध्यक्ष कृष्णा शिंदे, राज्य सदस्य सत्येंद्र राऊत, पुणे विभागीय अध्यक्ष नवनाथ खरात यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या कविसंमेलनाचे उद्घाटन दिव्यांग विद्यार्थ्यांच्या हस्ते होणार असून सर्व सहभागी कवी, कवयित्री यांना मानपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे. या नाविन्यपूर्ण उपक्रमाने दिव्यांग विद्यार्थ्यांना समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. निसर्गरम्य वातावरणात, दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षण, प्रशिक्षण, पुनर्वसन, कला, क्रिडा, सांस्कृतिक प्रगतीसाठी आपल्या बहुमोल काव्य शब्दसुमनाने प्रोत्साहन देण्यासाठी पर्यायाने दिव्यांग सेवा हीच राष्ट्रीय सेवा समजून राज्यभरातील साहित्यिक, कवी, कवयित्री यांनी या कविसंमेलनात सहभागी व्हावे असे आवाहन निवासी अपंग शाळेचे मुख्याध्यापक संयोजक बालाजी नादरगे, काव्यप्रेमी शिक्षक मंच सोलापूरचे जिल्हाध्यक्ष युवराज जगताप, भगवान चौगुले यांनी केले आहे.
नावनोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क -
युवराज जगताप - ९४०५२३७०८१
कृष्णा शिंदे - ९४२१८६१५२८
लक्ष्मण काटेकर - ७५८८०२०८८६
भगवान चौगुले - ७९७२६०२०३०
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment