24 January 2020
माकणी येथील बी एस एस कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या आठ विद्यार्थ्यांचा आविष्कार स्पर्धेत सहभाग
प्रतिनिधी / लोहारा
तालुक्यातील माकणी येथील बी एस एस कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या आठ विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथे आयोजित आविष्कार स्पर्धेत सहभाग घेतला. दि. २० व २१ जानेवारी रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने आयोजित या आविष्कार स्पर्धेत अमोल कुलकर्णी, आनंद गंभीरे, गणेश पाटील, श्वेता इंगळे, दिपाली चव्हाण, अयशा मुल्ला, आसिफ मुल्ला, कृष्णा गाडीलोहार या विद्यार्थ्यांनी भूगोल , राज्यशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र आदी विषयातील नाविन्यपूर्ण संकल्पनेचा वापर करून पर्यावरण असंतुलन, कारणे, परिणाम व उपाय, जमिन पीक पाणी वीज व्यवस्थापन, रासायनिक खतांच्या ऐवजी सेंद्रिय खतांचा वापर व महत्त्व, पक्षी, प्राणी, जलचर प्राणी यांचे मानवी जीवनातील महत्त्व, तसेच औषधी वनस्पती आणि मानवी आरोग्य, डेंग्यू आजारांवर उपचार व जनजागृती, भारतीय संविधानाचे महत्व इत्यादी विषयांवर पोस्टर प्रदर्शन व प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून वर्तमानातील समस्या संदर्भात जाणिव जागृती निर्माण करुन अनेकांची मने जिंकली. यावेळी संघ मार्गदर्शक म्हणून डॉ. बी. एच. जावळे व प्राध्यापिका आर. यू. चोचंडे यांनी काम पाहिले. सहभागी विद्यार्थी व प्राध्यापकांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एन. रेडे यांनी स्वागत केले.
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment