13 June 2019

21 टीएमसी पाण्यासंदर्भात संभाजीराजेंनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट - लवकरात लवकर तोडगा काढण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन





लोहारा प्रतिनिधी -

21 टीएमसी पाण्यासंदर्भात संभाजीराजेंनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट - लवकरात लवकर तोडगा काढण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन.


तीन दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीराजे यांनी मराठवाड्याच्या दुष्काळी भागाचा अभ्यास दौरा केला होता. या दौऱ्यात त्यांनी उस्मानाबाद जिल्ह्यात भेट दिली होती. यावेळी 21 टीएमसी पाण्याचा मुद्दा प्रामुख्याने समोर आला होता. त्यामुळे त्यांनी यासंदर्भात पाठपुरावा करणार असा शब्द दिला होता. त्याप्रमाणे 21 टीएमसी पाण्यासंदर्भात खासदार छत्रपती संभाजीराजेंनी गुरुवारी ( दि. 13) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांनी दुष्काळी परिस्थिती व 21 टीएमसी पाण्यासंदर्भात चर्चा केली. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी लवकरात लवकर तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्याचे सांगण्यात आले.
              या भेटीदरम्यान खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र दिले. या पत्रात लिहिले आहे की, मराठवाड्यामध्ये दुष्काळी परिस्थिती गंभीर आहे. ही परिस्थिती समजून घेण्यासाठी मी  तीन दिवसांपूर्वी अभ्यास दौरा केला. या दौऱ्यादरम्यान चारा छावण्या, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या भेटी, शेतकरी संघटनांच्या भेटी घेतल्या होत्या. यादरम्यान अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. अनेक मुद्दे समोर आले. यात एक मुद्दा सर्वांकडून विचारला गेला तो म्हणजे 21 टीएमसी पाण्याचा. अनेक वर्षांपासून मराठवाडा या हक्कापासून वंचित आहे. तो त्यांना मिळाला पाहिजे. त्यामुळे आपण स्वतः यात तातडीने लक्ष घालून हा मुद्दा प्राधान्याने सोडवावा अशी विनंती या पत्रात करण्यात आली आहे.
               सरकार गंभीर असून लवकरात लवकर तोडगा काढला जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संभाजीराजेना दिल्याचे सांगण्यात आले. यावेळी निवेदन देताना छत्रपती संभाजीराजेंचे स्वीय सहाय्यक योगेश केदार उपस्थित होते.

23 May 2019

लोहारा - छत्रपती संभाजी महाराज जयंती महोत्सव उत्साहात संपन्न - मराठा भूषण पुरस्काराचे मान्यवरांच्या हस्ते वितरण





लोहारा प्रतिनिधी -

लोहारा तालुका  संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ व जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी  देण्यात येणाऱ्या 'मराठा भूषण' पुरस्काराचे वितरण मंगळवारी (दि. 21) मान्यवरांचा हस्ते करण्यात आले. यावेळी शिवव्याख्याते अमोल मिटकरी यांचे व्याख्यान झाले.
               लोहारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मंगळवारी ( दि. 21) रात्री आठ च्या सुमारास हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यू पवार हे होते. यावेळी नगराध्यक्षा ज्योती मुळे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक उत्तम सूर्यवंशी, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा अर्चना अंबुरे, बब्रुवान पाटील, नेताजी गोरे, डॉ. संदीप तांबारे, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष सुनील साळुंके, अतुल गायकवाड, वंदना भगत, रंजना हासुरे, नागण्णा वकील, आबासाहेब साळुंके, जालिंदर कोकणे, पोलिस निरीक्षक सर्जेराव भंडारे, शिवाजी कदम, अॅड. दादासाहेब पाटील, किरण गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
             लोहारा तालुका संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड व मराठा सेवा संघाच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी 'मराठा भूषण' पुरस्कार देण्यात येतो. यावेळी तहसीलदार संजय पवार (उमरगा), तहसीलदार भरत सूर्यवंशी ( भोकर), विभागीय पोलिस अधिकारी  राहुल धस (उमरगा), अशोकराजे सरवदे (सास्तूर), डॉ. रोहित साळुंके (कोलीकट) या पाच जणांना शिवव्याख्याते अमोल मिटकरी यांच्या हस्ते मराठा भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील साळुंके यांनी केले. सूत्रसंचालन व आभार मोहन जाधव यांनी मानले. या कार्यक्रमासाठी महादेव वाघमारे, प्रकाश भगत, संतोष पवार, श्रीकांत गोरे, बालाजी सरवदे, भास्कर वैराळे, प्रताप पाटील, दयानंद थोरात, विजय लोमटे, डॉ. चंद्रशेखर गायकवाड, जगदीश पाटील, कृष्णाथ साठे, संजय जाधव, गोपाळ माने, मनोज देशपांडे, शैलेश चंदनशिवे, तानाजी मातोळे, विशाल मातोळे, योगेश बिराजदार, धनराज बिराजदार, लक्ष्मण बिराजदार यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

20 May 2019

लोहारा येथे संभाजी महाराज जयंती महोत्सवाचे आयोजन



लोहारा प्रतिनिधी -

लोहारा तालुका संभाजी ब्रिगेडच्या वतीने लोहारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मंगळवारी ( दि. 21) छत्रपती संभाजी महाराज जयंती महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी तालुकावासीयांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संभाजी ब्रिगेड चे तालुकाध्यक्ष सुनिल साळुंके यांनी केले आहे.
              लोहारा तालुका संभाजी ब्रिगेडच्या वतीने दरवर्षी छत्रपती संभाजी महाराज जयंती महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. याच कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा मराठा भूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो. यावर्षीही या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उदघाटन माजी मुख्याध्यापक उत्तम सूर्यवंशी यांच्या हस्ते होणार आहे तर संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यू पवार हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष राहणार आहेत. याच कार्यक्रमात शिवव्याख्याते अमोल मिटकरी यांचे व्याख्यान होणार आहे. तसेच उमरगा तहसिलदार संजय पवार, भोकर चे तहसीलदार भरत सूर्यवंशी, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, सामाजिक कार्यकर्ते अशोकराजे सरवदे, डॉ. रोहित साळुंके या मान्यवरांचा मराठा भूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी नेताजी गोरे, डॉ. संदीप तांबारे, प्रकाश धस, अतुल गायकवाड, अर्चना अंबुरे, किरण गायकवाड, प्रकाश भगत, शिवाजी कदम, प्रताप पाटील, भास्कर वैराळे, विजय लोमटे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. मंगळवारी ( दि. 21) सायंकाळी 6 वाजता लोहारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमासाठी तालुकावासीयांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संभाजी ब्रिगेड चे तालुकाध्यक्ष सुनिल साळुंके यांनी केले आहे.