18 May 2020

दुर्धर आजारग्रस्त एकल महिलांसाठी स्पर्श रुग्णालयाचा उपक्रम कौतुकास्पद - आमदार ज्ञानराज चौगुले



प्रतिनिधी / लोहारा

दोन महिन्यापासून संपूर्ण जगात कोरोनारूपी महामारीने थैमान घातले आहे. त्यामुळे संपूर्ण  जनजीवन ठप्प झाले आहे. हाताला काम नसल्यामुळे रोजंदारी करून जगणाऱ्या जनतेवर कठीण प्रसंगाची वेळ आली आहे. दुर्धर आजार असलेल्या रुग्णांची प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे व हाताला काम नसल्यामुळे एकल महिलांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. नेहमीच सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या तालुक्यातील सास्तुर येथील स्पर्श ग्रामीण रुग्णालयामार्फत युथफीडच्या माध्यमातून या कोरोना महामारीच्या लॉकडाऊनच्या काळातही आपला सामाजिक बांधिलकीच्या कामाचे वेगळेपण संपूर्ण उस्मानाबाद- लातूर जिल्ह्यात दाखून दिले आहे. या कार्याबद्दल स्पर्श ग्रामीण रुग्णालयाचे अभिनंदन व कौतुक करावे तेवढे कमी आहे असे प्रतिपादन आमदार ज्ञानराज चौगुले यांनी शनिवारी ( दि. १६) केले.
                 उस्मानाबाद- लातूर जिल्ह्यातील १५०० दुर्धर आजारग्रस्त एकल महिला कुटुंबाना दैनंदिन जीवनासाठी आवश्यक धान्य व इतर किटचा वाटप शुभारंभ उमरगा तहसील कार्यालयाच्या प्रांगणात शनिवारी( दि. १६) करण्यात आला. यावेळी आमदार चौगुले बोलत होते. यावेळी प्रातिनिधिक स्वरुपात २७ एकल महिलांना मान्यवरांच्या हस्ते किट वाटप करण्यात आले.
                उस्मानाबाद- लातूर जिल्ह्यतील दुर्धर आजारग्रस्त एकल महिलांना आधाराची खूप गरज होती. मुळातच त्यांची प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे व हाताला काम नसल्यामुळे त्यांची कुचंबणा होत होती. द प्राईड इंडिया स्पर्श ग्रामीण रुग्णालय सास्तूर यांनी याबाबत पुढाकार घेतला व दोन्ही जिल्ह्यमधील एकल महिला व बाधित मुलांची यादी तयार करून मदतीसाठी आवाहन केले. सदर आवाहनाला प्रतिसाद देत मुंबईस्थित युथफीड या संस्थने विशेष मोहीम राबवून स्पर्श ग्रामीण रुग्णालयला १००० अन्न धान्याचे कीटची मदत दिली. उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यतील बाधित एकल महिलांना त्याचा काही प्रमाणात आधार मिळेल या हेतूने सदर किटचे वाटप करण्याचे नियोजन केले. प्रायोगिक तत्वावर या मोहिमेचा शुभारंभ तहसील कार्यालय उमरगा येथे  आ. ज्ञानराज चौगुले, किरण गायकवाड, उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, तहसीलदार संजय पवार, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. पंडित पुरी आदींच्या उपस्थितीत संपन्न झाला.



                    प्रास्ताविक करताना स्पर्श चे प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी म्हणाले कि, उस्मानाबाद- लातूर जिल्ह्यातील दुर्धर आजारग्रस्त १५०० एकल महिलेवर अवलबुन असलेल्या तिच्या मुलाबाळांचा कुटुंबाचा शोध घेऊन एकल महिलांना स्पर्श ग्रामीण रूग्णालया मार्फत जीवनावश्यक अन्न धान्याच्या साहित्याचे किट चे वाटप घरपोच करण्यात येणार आहे. या जीवनावश्यक अन्न धान्य कीटमध्ये १० किलो गहू आटा, १ किलो तांदूळ, १ किलो तुरडाळ, १ किलो मसूरडाळ, १ किलो साखर, चहा पावडर, २ किलो तांदूळ, पावकिलो लाल तिखट, १ किलो किर्तीगोल्ड तेल पाकीट, १ किलो मीठ, १ किलो कांदे, १ किलो बटाटे अंगाचा व कपड्याचा साबण, सँनिटायझर, मास्क व इतर एक महिना पुरेल एवढे साहित्य या कीट मध्ये आहे. कोरोनामुळे व दुर्धर आजारामुळे होणारी १५०० एकल महिला कुटुंबाची मानसिक ओढाताण व उपासमार कमी होणार आहे. अशी माहिती स्पर्श ग्रामीण रुग्णालयाचे प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी यांनी यावेळी दिली. आमदार ज्ञानराज चौगुले यांनी स्पर्शच्या कामाबद्दल व अशा परस्थितील सामाजिक बांधिलकी जोपासल्या बद्दल कौतुक केले. व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या व एकही गरजू वंचित राहणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन केले.
               उपविभागिय अधिकारी श्री विठ्ठल उदमले यांनी सदर उपक्रमाबद्दल संस्थेचे आभार मानून गरजू पर्यंत लाभ दिल्याबद्दल कौतुक केले. यावेळी उमरगा व मुरूम आय.सी.टी.सी चे समुपदेशक अभय भालेराव, संतोष थोरात, अविनाश काळे, सामाजिक कार्यकर्ते किशोर शिंदे व स्पर्श ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी उपस्थित होते. स्पर्श च्या कर्मचाऱ्यांमार्फत गावोगावी जाऊन हे साहित्य घरपोच वाटप करण्याचे स्पर्श चे नियोजन असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

No comments:

Post a Comment