07 May 2020

भाऊसाहेब बिराजदार बँकेचे वतीने गरजू कुटुंबाना जिवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप




प्रतिनिधी / उमरगा

लॉकडाऊन मुळे सर्वत्र जनजीवन ठप्प झाले आहे. सर्व कामधंदे बंद आहेत. त्यामुळे अनेक रोजंदारी करणाऱ्यांसमोर उद्याचा दिवस कसा जाईल हा प्रश्न निर्माण झाला आहे.  त्यामुळे अशा अडचणीत असणाऱ्या गरजू २५१ कुटुंबांना भाऊसाहेब बिराजदार नागरी सहकारी बँकेच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले. उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, तहसीलदार संजय पवार यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात हे वाटप करण्यात आले. यावेळी बँकेचे चेअरमन प्रा. सुरेश बिराजदार यांची प्रमुख उपस्थिती होती.


             गरिब परिस्थितीत आपले जीवन व्यतीत करणाऱ्या व ज्यांना घरी कोणाचा आधार नाही अशा महिला, पुरुष, विधवा, वृद्ध महिला, ज्यांच्या घरात कर्ता पुरुष नाही अशा कुटुंबाना दैनंदिन जीवनात लागणाऱ्या जीवनावश्‍यक वस्तूंचे वाटप बँकेच्या वतीने करण्यात येत आहे. गरजु लोकांची माहीती घेऊन त्यांना घरपोच मदत पोहचविली जात आहे. अशा कठीण प्रसंगी गरजुंना मदत करुन सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम भाऊसाहेब बिराजदार बँकेच्या वतीने केले जात आहे.


           यावेळी किट वाटपासाठी नायब तहसीलदार विलास तरंगे, बँकेचे सरव्यवस्थापक रमेश शहापुरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा नगरसेवक संजय पवार, नगरसेवक बालाजी पाटील, डॉ. विजयानंद बिराजदार, प्रकाश कदम, खाजा मुजावर, वसुली अधिकारी सुरेंद्र पौळ, संदीप जाधव, दयानंद बिराजदार ,सह वसुली अधिकारी अमोल पाटील, विजय चव्हाण, अजित पाटील, संतोष शिरगुरे, सतीश सुरवसे, विनोद जाधव, वामन भोरे, राजु राठोड, बळी चव्हाण यांच्यासह कर्मचारी उपस्थिती होते.

No comments:

Post a Comment