12 July 2020
कुस्ती मल्लविद्या महासंघाच्या लोहारा तालुकाध्यक्ष पदी पै. रामेश्वर कार्ले यांची निवड झाल्याबद्दल भाजपाच्या वतीने सत्कार
प्रतिनिधी / लोहारा
कुस्ती मल्लविद्या महासंघाच्या लोहारा तालुकाध्यक्ष पदी पै. रामेश्वर कार्ले यांची निवड झाल्याबद्दल लोहारा तालुका भाजपाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
तालुक्यातील विलासपुर पांढरी येथील रामेश्वर कार्ले यांची कुस्ती मल्लविद्या महासंघाच्या लोहारा तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. पैलवान होण्यासाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कार्ले यांनी खडतर प्रवास केला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील एक होतकरू व अग्रगण्य पैलवान म्हणून त्यांनी नावलौकिक मिळविला आहे. त्यांच्या या निवडीबद्दल भाजपाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष बालाजी चव्हाण, उपसरपंच डिगबंर मुळे, गजेंद्र बिराजदार खंडेराव कार्ले उपस्थित होते.
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment