प्रतिनिधी / उस्मानाबाद
लोहारा तालुक्यातील हिप्परगा ( रवा) येथील स्वामी रामानंद तीर्थ विद्यालयाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असताना ऑनलाईन सह ऑफलाइन शिक्षण सुरू केले आहे. या ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थी व पालक यांच्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद आहेत. अशा वेळी विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथील स्वामी रामानंद तीर्थ विद्यालयाच्या
शिक्षकांनी शाळा बंद पण शिक्षण सुरू हा उपक्रम यशस्वीपणे राबविला आहे. या शाळेत आठवी ते दहावीचे वर्ग असून प्रत्येक वर्गाचे उन्हाळ्यात व्हाट्सअप ग्रुप बनवले. लॉकडाऊन च्या काळात पालकांना व विद्यार्थ्यांना कॉल करून संवाद साधून त्यांच्या समस्या सोडवल्या. शैक्षणिक व्हिडिओ, शैक्षणिक युट्युब चॅनेल, ऑनलाइन टेस्ट व अभ्यासक्रमाच्या पीडीएफ पालकांच्या मोबाईलवर पाठवून अभ्यास करून घेत आहेत. एक जुलैपासून शाळेने गुगल मीट या ॲपच्या साहाय्याने दररोज प्रत्येक वर्गाला सकाळी दहा ते बारा या वेळेत ऑनलाईन तास सुरू केले आहेत. दररोज दोन विषयाचे अध्यापन शिक्षक करतात. शाळेने ऑनलाईन तासिकेचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. त्याप्रमाणे संबंधित विषयाचे शिक्षक अगोदरच्या दिवशी लिंक पाठवतात. लिंकच्या खाली विषय, वेळ, पाठाचे नाव व्हाट्सअप ग्रुप वर पाठवतात. शाळेच्या लर्न फ्रॉम होम व वर्क फ्रॉम होम या उपक्रमास पालकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. हे नियोजन करीत असताना शाळेने प्रत्यक्ष पालकांशी संपर्क साधून वेळेचे नियोजन केले. पालकांची मानसिकता तयार केली. ज्या शिक्षकांचे तास नाहीत ते शिक्षक जॉईन न झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांशी संपर्क साधतात. बाहेरगावच्या विद्यार्थ्यांचे नियोजन सेवक पाहतात. शाळेने सर्व विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर दीक्षा ॲप डाऊनलोड केलेले आहे. सर्व विद्यार्थ्यांना घरोघरी जाऊन मोफत पाठ्यपुस्तके वाटप केले आहे. सध्या शिक्षक पीपीटी तयार करणे, नोट्स काढणे, ऑनलाइन टेस्ट तयार करीत आहेत. प्रत्यक्ष गृहभेटी देऊन पालकांचे व विद्यार्थ्यांचे समुपदेशन करत आहेत. या ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थी व पालक यांच्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. ज्या विद्यार्थ्याकडे स्मार्टफोन नाही अशा विद्यार्थ्यांना नोट्स देणे, माहिती सांगणे, फोनवरून शंका समाधान करणे व जे विद्यार्थी ऑनलाइन तासिकेला जॉईन झाले नाहीत. त्या विद्यार्थ्यांची अडचण समजून घेतल्या जातात. या शाळेचे मुख्याध्यापक संजय भोयटे हे सर्व शिक्षकांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वीपणे राबवत आहेत. तसेच परिसरातील शिक्षकांना सतत मार्गदर्शन करत आहेत. हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष वामनराव जाधव, सचिव पंडीत जाधव यांनीही योगदान दिले आहे. तसेच संस्थेचे पदाधिकारी, शाळेतील शिक्षक एम.के. जाधव, बी.एस. स्वामी, जी.डी. मैंदाड, बी.जे. मनोहर, ए .व्ही. जाधव, एस . के. जाधव, सेवक एन .पी. जाधव, एस.के. पांचाळ, एम.एम. प्रताप हे प्रयत्न करीत आहेत.
स्वामी रामानंद तीर्थ विद्यालयाने ऑनलाइन शिक्षणाचा हा उपक्रम अतिशय यशस्वीपणे सुरु केला असून त्याबद्दल मुख्याध्यापक संजय भोयटे व त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन करतो. इतर शाळाने ही असे उपक्रम राबवावेत.
दत्तप्रसाद जंगम,
विस्तार अधिकारी, लोहारा
स्वामी रामानंद तीर्थ विद्यालयाच्या ऑनलाईन तासिकेला मी स्वतः जॉईन होतो. शाळेच्या सर्व शिक्षकांनी मेहनत घेऊन तासिका सुरू केल्या आहेत . या शाळेचे मी अभिनंदन करतो.
संतोष माळी
विस्तार अधिकारी, माध्यमिक
जि.प. उस्मानाबाद
ऑनलाइन शिक्षणाचा उपक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष वामनराव जाधव, सचिव पंडीतराव जाधव, मुख्याध्यापक संजय भोयटे, शाळेतील शिक्षक एम.के. जाधव, बी.एस. स्वामी, जी.डी. मैंदाड, बी.जे. मनोहर, ए .व्ही. जाधव, एस . के. जाधव, सेवक एन .पी. जाधव, एस.के. पांचाळ, एम.एम. प्रताप हे प्रयत्न करीत आहेत.
संजय भोयटे,
मुख्याध्यापक,
स्वामी रामानंद तीर्थ विद्यालय,




No comments:
Post a Comment