प्रतिनिधी / उस्मानाबाद
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इ. १० वी चा निकाल बुधवारी ( दि.२९) दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर झाला. उमरगा शहरातील श्री श्री रविशंकर माध्यमिक विद्यामंदिरचा निकाल १०० टक्के लागला आहे. कु. श्रद्धा माने हिने ९७.६० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला आहे. उमरगा शहरातील श्री श्री रविशंकर माध्यमिक विद्यामंदिर चे एकूण २७ विदयार्थी परीक्षेस बसले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन शाळेचा निकाल १०० टक्के लागला असून विद्यालयातील श्रद्धा माने ९७.६० टक्के प्रथम, वैभव बिराजदार ९३.८० टक्के द्वितीय तर वैष्णव माने ९३.६० टक्के गुण मिळवित तृतीय क्रमांक मिळविला. विद्यालयाच्या एकूण दहा विद्यार्थ्यांनी ९० टक्के पेक्षा जास्त गुण संपादन केले आहेत. गायकवाड सानिका, जाधव स्नेहा, जाधव प्राची, सुर्यवंशी पल्लवी, पाटील श्वेता, माने महेश यांनी उज्वल यश संपादन केले आहे. संस्थेच्या अध्यक्षा डॉ. दीपा मोरे, सचिव डॉ. सुरेश चव्हाण, मार्गदर्शक डॉ. उदयसिंह मोरे, अशोक जोशी, मुख्याध्यापक डिगंबर कुलकर्णी, गणपत देवकर, हिरानाथ सगर, शिल्पा जगताप यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
![]() |
| श्रद्धा माने - ९७.६० टक्के |
![]() |
| वैभव बिराजदार - ९३.८० टक्के |
![]() |
| वैष्णव माने - ९३.६० टक्के |




No comments:
Post a Comment