25 July 2020
आमदार ज्ञानराज चौगुले यांनी करून घेतली रॅपिड अँटीजन टेस्ट - अहवाल आला निगेटिव्ह
प्रतिनिधी / उमरगा
सध्या सर्वसामान्य नागरिकांमध्ये कोविड १९ आजाराच्या तपासणी बाबत कमालीची भीती आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक सदर तपासणी करून घेण्यास सहसा धजावत नाही असे दिसून येत आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढण्यामागे हेही एक महत्वाचे कारण असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत जनमानसात जागरूकता निर्माण व्हावी, त्यांच्यातील भीती कमी व्हावी या उद्देशाने आमदार ज्ञानराज चौगुले यांनी रॅपिड अँटीजन टेस्ट ही कोविड १९ आजाराची प्राथमिक तपासणी करून घेतली. सदर चाचणीचा अहवालही निगेटिव्ह आला. सदर चाचणी ही अत्यंत साधी व सोप्या पद्धतीची असून चाचणी केल्यानंतर काही वेळात लगेच अहवाल समजतो. याचप्रमाणे मतदारसंघातील जास्तीत जास्त नागरिकांनी तपासण्या करून घ्याव्यात असे आवाहन आमदार ज्ञानराज चौगुले यांनी केले आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment